• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण रेल्वे १५ जुलैला सुरू करण्यासाठी हालचाली सुरू? त्याआधी स्टेशनला तळ्याचे स्वरूप

ByEditor

Jul 5, 2023

घनःश्याम कडू
उरण :
गेली अनेक वर्षे उरण रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेकवेळा उरण रेल्वेचे उद्घाटन होईल असे सांगितले जात होते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या १५ जुलै रोजी उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या सूत्राकडून दिली जात आहे. परंतु मागच्या तारखे प्रमाणे १५ जुलै ही तारीख जाणार नाही ना अशी चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे. परंतु त्या आधीच रेल्वे स्टेशनच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. त्यामुळे १५ जुलै रोजी उरण रेल्वे सुरू होईल याची शक्यता कमी दिसत आहे.

रेल्वे प्रशासनाने मागील तीन चार वर्षांपासून या रेल्वे मार्गावरील कामे पुर्णत्वास नेऊन या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या अनेकवेळा तारखा जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने फेब्रुवारी ,मार्च,मे २०२३ महिन्याच्या अखेरीस या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होईल असे सांगितले होते. याबाबत सुरक्षा यंत्रणांकडून अनेक वेळा या मार्गावर रेल्वे फिरवून चाचपणी करण्यात आली होती. परंतु रेल्वे काही सुरू झाली नाही.

दोन तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे स्टेशनमध्ये पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. त्यामध्ये काही तरुण पोहताना दिसत आहे. रेल्वे सुरू होण्याआधी ही अवस्था असेल तर नंतर काय परिस्थिती असेल. यामुळे येत्या १५ जुलै उरण रेल्वे सुरू होणार असे सांगितले जात आहे. परंतु ही परिस्थिती पहाता रेल्वे सुरू होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

खारकोपर रेल्वे सुरु झाल्याने उरण पर्यंत कधी येईल याकडे उरणकरांचे लक्ष लागून राहिले होते. अनेकवेळा उद्घाटनाची तारीख देऊनही काही रेल्वे सुरू झाली नाही. आता पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाने येत्या १५ जुलै रोजी उरण रेल्वे सुरू करण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे समजते. उरणकरांना अनेकवेळा उद्घाटन होईल असे सांगितले जाते, परंतु ज्यावेळी खरोखर सुरू होईल त्याचवेळी उरणकरांचा विश्वास बसेल अन्यथा तारीख पै तारीख वाट पहावी लागेल.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!