• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी एस. टी. वानखेडे

ByEditor

Jun 3, 2024

मिलिंद माने
महाड :
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी महाविद्यालयातील प्राध्यापक एस. टी. वानखेडे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. एस. टी. वानखेडे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आहे. गेली अनेक वर्ष या महाविद्यालयाने लाखो विद्यार्थ्यांना घडवले आहे. शैक्षणिक दर्जा कायम ठेवत विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे काम महाविद्यालय करत आहे. सध्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. आरती वानखेडे या काम करत असून उपप्राचार्य पदी नुकतीच एस. टी. वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे सध्याचे चेअरमन आनंदराज आंबेडकर यांनी महाविद्यालयाला भेट देऊन वानखेडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्राध्यापक एस. टी. वानखेडे हे गेली अनेक वर्ष ज्युनिअर कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी त्यांची धडपड कायम असते. ग्रामीण विद्यार्थ्यांना बारावीनंतर काय करता येईल याबाबत नेहमीच मार्गदर्शन करतात. शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचा कायम पुढाकार असतो. यामुळे उपप्राचार्य पदी नियुक्ती होताच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी आणि महाडमधील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!