• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पँथर संजय गायकवाड यांची आरपीआय उरण तालुका अध्यक्षपदी निवड

ByEditor

Jul 5, 2023

वैशाली कडू
उरण :
उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संजय गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उरण तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पूर्वीचे पँथरचे कार्यकर्ते संजय गायकवाड यांचे सामाजिक काम पाहता, कामगार व सर्व थरातील श्रमिक वर्गात कामाचे संघटन कौशल्य पाहून केंद्रीय समाजकल्याण मंत्री, रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थदादा कासारे, रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते संजय जनार्दन गायकवाड यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उरण तालुका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती आंध्र कला समिती हॉल, नवीन पनवेल येथे २ जुलै २०२३ रोजी करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय गायकवाड यांच्या निवडीने उरण तालुक्यातील सर्व थरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या चाहत्यांनी गायकवाड यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!