• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

१९ वर्षाखालील व वरिष्ठ गटाच्या मुलींच्या सराव शिबिराचे पेण येथे आयोजन

ByEditor

Jun 8, 2024

क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित १९ वर्षांखालील व वरिष्ठ गटातील मुलींचे सराव शिबिर पेण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नगरपालिका मैदान येथे दि. १० व ११ जुन २०२४ (सोमवार व मंगळवार) रोजी आयोजित करण्यात आले आहे.

पंधरा वर्षावरील मुलींसाठी (१/९/२००९ पूर्वी जन्मलेल्या मुलींसाठी) हे शिबीर असणार आहे. सदर शिबिरासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व मुलींनी क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात व आवश्यक क्रिकेट साहित्यासह सकाळी ८:३० वाजता पेण नगरपालिका मैदानावर हजर राहायचे आहे. सर्व खेळाडूंनी सोबत आधारकार्ड (ओरिजीनल आणि फोटोकाॅपी) व स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो आणावा. सदर क्रिकेट शिबिरासाठी सहभागी होण्याकरिता कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नाही. सदर शिबिर रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ९४२२५९४१४१ व ८७६७९५९९६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

By Editor

One thought on “१९ वर्षाखालील व वरिष्ठ गटाच्या मुलींच्या सराव शिबिराचे पेण येथे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!