• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कै. बापुसाहेब देशपांडे विद्यासंकुलामध्ये शैक्षणिक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पसंती ही शाळेची गुणवत्ता दर्शवणारी -नरेंद्र जैन

ByEditor

Jul 7, 2023

किरण लाड
नागोठणे :
कोएसोच्या कै. बापुसाहेब देशपांडे विद्यासंकुलामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे दर्जेदार शिक्षण तसेच शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक वर्ग घेत असलेल्या मेहनतीमुळे शाळेचा लागणारा चांगला निकाल, यामुळे शाळेमध्ये प्रवेशासाठी जिल्हयातील विद्यार्थ्यांची वाढती पसंती ही शाळेची गुणवत्ता सिध्द करणारी आहे याचा मला अभिमान आहे असे गौरवोद्गार शाळा समितीचे चेअरमन नरेंद्र जैन यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी काढले.

कोएसो कै. बापुसाहेब देशपांडे विद्यासंकुलामधील गु. रा. अग्रवाल विद्यामंदिर, माध्यमिक शाळा व कै. सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालयातील 10वी 12वी मध्ये प्रथम, व्दितीय, तृतीय क्रंमाकांने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या वेळी ते बोलत होते. ६ जुलै रोजी हा सत्कार समारंभ पार पडला. नरेंद्र जैन पुढे म्हणाले कि, आमच्या शाळेनी दर्जेदार शिक्षणाच्या जोरावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमधील चांगल्या निकालाची परंपरा जिल्हयात कायम ठेवली आहे. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी रायगड जिल्हयातील विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढलेला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबर त्यांच्या अंगीकृत कलागुणांना वाव देण्याचे काम येथील शिक्षक वर्ग करीत असतात. त्यामुळे शाळेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे असे गौरवोद्गार जैन यांनी बोलतांना काढले.

यावेळी माध्यमिक शाळा 10वी मधील कु. सृष्टी दत्ता श्रीवर्धनकर, ब्रिजेश शिवनरेश मौर्या, श्रावणी योगेंद्र चौलकर तसेच 12वी मधील अनुक्रमे विज्ञान शाखेतील कु. नवनीत ललित लेंडी, अक्षता संजय खाडे, तेजस मगन चव्हाण, वाणिज्य शाखा कु. शितल रमेश भोईर, दक्षता वासुदेव पाटील, राहुल चंद्रकांत म्हात्रे, कला शाखा कु. खुशी संजय सिंग, वैष्णवी प्रमोद पाटील, दर्पण गजानन भोईर असे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाळा समितीचे मान्यवर तसेच प्राध्यापक, शिक्षक वर्ग मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळा समितीचे चेअरमन नरेंद्र जैन, सदस्य अनिल काळे, अॅड. सोनल जैन, प्राचार्य अनंत चिनके, निवृत्त शिक्षक बी. एम. सोलेगावकर, शिक्षक प्रतिनिधी अे. आर. गावित, शिक्षकतेर प्रतिनिधी संतोष गोळे, सकाळ सत्र प्रमुख एन. एन. गायकवाड, दुपार सत्र प्रमुख आर. टी. जेडगे, आर. के. जगताप, कांचन पारंगे, साक्षी शिंदे, संध्याराणी सरगडे, मेघना म्हात्रे, मानसी शिंदे, कैलास गाडे, अमित म्हात्रे, प्रगती बहुरुपी, पालक प्रतिनिधी दत्ता श्रीवर्धनकर व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनंत चिनके, सुत्रसंचालन संध्याराणी सरगडे तर आभारप्रदर्शन एन. एन. गायकवाड यांनी केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!