प्रतिनिधी
नागोठणे : शुक्रवार, दि २१ जून २०२४ रोजी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. त्या अनुषंगाने भारतीय विद्या संकुलामध्ये पतंजली योगपीठ तत्त्ववधानमधून महिला सशक्तीकरणासाठी आंतराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग महोत्सव प्रमुख अतिथी मीना अग्रवाल व संजय सेनी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

डॉ. रेश्मा मढवी यांनी प्रमुख अतिथी मीना अग्रवाल व संजय सेनी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मीना अग्रवाल, शांताबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्या डॉ. रेश्मा मढवी, एसएसओएसपी डिप्लोमा कॉलेजचे रजिस्ट्रार प्रो. वैभव नांदगावकर, प्राचार्य प्रो. विशाल पाटील तसेच एस. डी. परमार इंग्लिश मिडीयमच्या प्राचार्य अमृता गायकवाड यांनी दीपप्रज्ज्वलन केले.

मीना अग्रवाल आणि त्यांचे सहकारी संजय सेनी यांनी योग प्रार्थनेने कार्यक्र्माची सुरुवात केली. कार्यक्रमामध्ये प्राणायामचे विशेष महत्व कसे ते कपालभाती प्राणायाम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान, नाडी शोधन प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच सूर्यनमस्कार व आणखी वेगवेगळ्या आसनांचे प्रात्यक्षिक करून सर्व उपस्थितीत भारतीय विद्या संकुलाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांच्याकडूनही करून घेण्यात आले. आपल्या शरीरात वेगवेगळ्या सिस्टिम काम करतात त्यामुळे आपण फिजीकल ऍक्टिव्हिटी करून आपले मसक्यूलर प्रॉपर काम करतात त्यामुळे आपली हेल्थ पॉवर आणि मेंटल स्ट्रेस कंट्रोलमध्ये ठेवू शकतो हे ही त्यांनी सांगितले.
भारतीय विद्या संकुलाचे चेअरमन किशोर जैन, एसएसओएसपी डिप्लोमा कॉलेजचे सीईओ कार्तिक जैन, एस. डी. परमार इंग्लिश मिडीयमचे संचालक सुरेश जैन यांनी आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रमुख अतिथी मीना अग्रवाल, संजय सेनी व भारतीय विद्या संकुलाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी वर्ग यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.