• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

प्रत्येक शाळेत रोज एक तास योगासाठी असावा – डॉ. राजाराम हुलवान

ByEditor

Jun 23, 2024

प्रतिनिधी
अलिबाग :
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र आयोजित रायगड जिल्हा परिषद शाळा सायमन कॉलनी येथे योग दिवस साजरा करण्यात आला.

माणुसकी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलांना आरोग्य चांगले मिळावे या उद्देशाने शाळेत योगाचा क्लास सुरू करून योग हे मुलांपासूनच शिकविले पाहिजे आणि हा योग दिवस रोज चालवा ह्या हेतूने याची सुरुवात प्रत्येक शाळांनी करावी या प्रेरणेने माणुसकी आरोग्य विभाग सदस्य डॉ. राकेश सिंग यांनी आज शाळेतील मुलांना सूर्यनमस्कार व इतर योगासने करून दाखवत त्यांच्याकडून करवून घेतली. याचे आपल्या भविष्यात किती महत्व आहे याची जाणीव करून दिली. उत्तम आरोग्य कसे टिकवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. पवार यांनी माणुसकी प्रतिष्ठानचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!