क्रीडा प्रतिनिधी
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राज्य पॅनलवर पंचांची नियुक्ती करण्यासाठी जुलै व ऑगस्ट २०२४ मध्ये एक परीक्षा आयोजित करणार आहे. हि परीक्षा १८ वर्षा वरील सर्व उमेदवारांसाठी खुली आहे. परीक्षा शुल्क ५०० रुपये अधिक जीएसटी म्हणजे ५९० रुपये एवढी असेल. परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी अंतिम तारीख ३ जुलै २०२४ आहे. या तारखेनंतर प्राप्त झालेल्या नोंदणी स्वीकारल्या जाणार नाहीत.
महत्वाच्या सुचना
१) नोंदणी फार्ममध्ये प्रदान केलेल्या एमसीए QR कोडवर पेमेंट करणे आवश्यक आहे.पेमेंटचा पुरावा (स्क्रिनशॉट) अपलोड करणे आवश्यक आहे.
२) नोंदणीच्या अंतिम तारखेनंतर सर्व उमेदवारांना अभ्यासक्रम, स्वरूप आणि परीक्षेचे वेळापत्रक कळवले जाईल.
३) प्राप्त झालेल्या नोंदणीच्या संख्येवर अवलंबून,महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मुख्य राज्य पॅनल परिक्षेपूर्वी प्राथमिक तपासणी परीक्षा आयोजित करू शकते .
४) नोंदणीमध्ये चुकीची माहिती दिली असल्यास किंवा परीक्षा शुल्क न भरल्यास नोंदणी न स्वीकारण्याचा अधिकार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन राखून ठेवतो.
अधिक माहितीसाठी संपर्क – अजय देशपांडे +९१ ९८२३४४०५०५, पंच परीक्षेसाठी नोंदणी लिंक – https://bit.ly/4ckbUOb
रायगड जिल्ह्या क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व क्रिकेट पंचांना एमसीए पंच परीक्षा देण्यासाठी आव्हान केले आहे, तसेच परिक्षेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आरडीसीए सदस्य व जिल्ह्यातील एमसीए स्टेट पॅनल पंच ॲड. पंकज पंडित – ८१४९२५२८२९ व सुयोग चौधरी – ८१०४८८७९०० यांच्याशी संपर्क साधावा.