प्रतिनिधी
नागोठणे : तामसोली-सावरट गावातील रा. जि.प. प्राथमिक शाळा येथे बाळगोपाळ फाऊंडेशन, खार (मुंबई) यांच्यावतीने दि. 22/06/2024 रोजी वचनपूर्ती सोहळा शाळा सुरु झाल्याचे औचित्य साधुन दिमाखात पार पडला. बाळगोपाळ फाऊंडेशन, खार-मुंबई यांच्यावतीने तामसोली व आजूबाजूच्या परिसरातील एकूण पाच शाळांचे निरीक्षण करून रा. जि. प. प्राथमिक शाळा तामसोली, घोगरकर वाडी व मांडवशेत शाळा या तीन शाळांचे रंगकाम करणे, लादी बसवणे, वायरिंग करणे, शाळेसाठी पंखे आदी कामे फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली. सदर प्रसंगी याच परिसरातील वेताळ वाडी व गणपती वाडी या शाळेतील मुलांना व तामसोली-सावरट शाळा, घोगरकर वाडी शाळा या सर्व शाळेतील एकूण 82 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना साडी वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमात बाळगोपाळ फाऊंडेशनचे अध्यक्ष सखाराम वायंगणकर, शाळांचे मुख्यध्यापक व शिक्षकांनी तसेच इतर मान्यवरांनी आपले विचार भाषणातून व्यक्त केले.
या कार्यकामास किशोर पाडावे, नितिन खांबल, सचिन पाटील, विकास तेजम, संदीप जाधव, शशिकांत तरफे, पांडुरंग बागकर, अरुण दणदने, प्रमोद पेडणेकर, सचिन टेमकर, विनोद धुरिया, मनोज शिरसे यांच्यासह रा.जि.प. प्राथमिक शाळा तामसोलीचे मुख्याध्यापक प्रशांत धाया डाकी, अरुण म्हात्रे , वेताळवाडी शाळा मुख्याध्यापक सुरेश काळे, सहशिक्षक केशव भोईर, मुख्याध्यापिका प्रमिला भोनकर, उप शिक्षक वसंत डाकी, योगेश वऱ्हाडी, रुपाली गोडे, अंगणवाडी सेविका मदतनीस, ग्रुप ग्रामपंचायत ऐनघर सरपंच अर्चना भोसले, सदस्य प्रकाश डोबले, तामसोली शाळा कमिटीचे अध्यक्ष विजय शिरसे, शा. व्य. समिती सदस्या, तामसोली गाव अध्यक्ष उमाजी चव्हाण, नानाजी शिरसे, परशुराम शिरसे, तामसोली गावचे पोलिस पाटील महेश शिरसे, रवींद्र यादव, सचिन भोसले, प्रफुल कणघरे, राजेश भिलारे, मंगेश कणघरे आदी मान्यवर व फाऊंडेशनचे सभासद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनम्हात्रे सर व पांडुरंग बागकर यांनी केले.
या पाच ग्रामीण भागातील शाळांना अपेक्षित सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना भोसले यांनी गावाच्या वतीने बालगोपाळ फाउंडेशनचे आभार मानले.