अनंत नारंगीकर
उरण : सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील सेक्टर ५० ते सेक्टर ५६ या ठिकाणच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर बाजार सुरू केला आहे. त्यामुळे उरण-नवीमुंबई शहराच्या दिशेने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालक, प्रवाशी नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

सिडकोने द्रोणागिरी नोड परिसरातील सेक्टर ५० ते सेक्टर ५६ या भूखंडावर रहिवाशी संकुल उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु, सदर रहिवासी संकुलाच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर बाजार सुरू केला आहे. त्यामुळे उरण-नवीमुंबई शहराच्या दिशेने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनचालक, प्रवाशी नागरिकांना नाहक वाहतूक कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. तरी राज्याच्या नगरविकास मंत्र्यांनी सिडकोच्या मुजोरखोरी विरोधात ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
द्रोणागिरी नोड या परिसरातील सेक्टर ५१ मधील रस्त्यांचा वापर वाहनचालक, प्रवाशी नागरीक रहदारीसाठी करत आहेत. अशा मुख्य रहदारीच्या रस्त्यावर सिडकोने बाजार थाटण्यासाठी परवानगी दिली असेल तर या रस्त्यावर अपघात झाला तर त्याला जबाबदार सिडकोचे व्यवस्थापकीय अधिकारी राहणार आहेत
-मंजुळा वाघमारे,
प्रवाशी नागरिक