• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

लोणेरे बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य!

ByEditor

Jun 27, 2024

गटारावरील अतिक्रमण तातडीने हटाव ग्रामस्थांची मागणी

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील लोणेरे गावातील बाजारपेठेतील मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अत्यंत गरजेचे असताना काम न झाल्याने लोणारे बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने फार मोठे खड्डे पडले आहेत. पाऊस पडला कि बाजारपेठेत चिखल होतो व त्यामुळे चालताना चिखलातून कसरत करावी लागते.

गटारावर व रस्त्यापर्यंत अतिक्रमण झाल्याने चालणाऱ्यांना गटारावरून सुद्धा चालत येत नाही. बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांची कुचंबणा होते. शाळेतील विद्यार्थी व प्रवासी यांना रस्त्यावरून चालणं कठीण झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यपीठातील विद्यर्थी, शिक्षक, कर्मचारी व प्रवेश घेण्यासाठी आलेल्या पालकांना फार दुरवस्था झालेली पहायला मिळते. याची गांभीर्याने मुंबई-गोवा महामार्गाचे अधिकारी व ठेकेदारांनी दाखल घ्यावी व लोणेरे बाजारपेठेत लोकांनी जे गटारावर अतिक्रमण केले आहेत ते तातडीने युद्ध पातळीवर काढावे व त्याकरीता ग्रामपंचायत, सरपंच व पोलीस ठाणे यांनी पुढाकार घ्यावा अशी समस्थ ग्रामस्थांची मागणी आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!