• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अलिबाग-रेवस मार्गावर नांदाईपाडा फाट्यावर झाड कोसळून वाहतूक ठप्प

ByEditor

Jul 1, 2024

पडलेले झाड बाजूला करण्यात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख दिलीप भोईर यांचा पुढाकार

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग-रेवस मार्गावर सोमवार, दि. १जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास नांदाईपाडा फाट्यावर भररस्त्यात झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख दिलीप भोईर (छोटम शेठ) यांनी आपल्या मित्रपरिवारांसह घटनास्थळी धाव घेऊन पडलेले झाड जेसीबी व इतर यंत्रणेच्या साहाय्याने बाजूला करत प्रवाशांना व वाहनचालकांना मोठा दिलासा दिला. यावेळी मांडवा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. वाहतूक कोंडी झाल्यानंतर अनेक वाहनचालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त केली. या मार्गावरील धोकादायक असलेली झाडे लवकरात लवकर काढून टाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!