मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कागद पत्रासाठी तहसील सेतू कार्यलयात महिलांची गर्दी
अनंत नारंगीकर
उरण : महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरु केलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी तहसील कार्यालयातील सेतू कार्यालयामध्ये मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” हि महाराष्ट्र शासनाच्या महिला बाळ विकास विभागामार्फत योजना सुरु करण्यात आली आहे. पुरुषांच्या रोजगारांच्या टक्केवारीपेक्षा महिलांची टक्केवारी हि कमी आहे. महिलांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधरणा तसेच महिलांच्या आरोग्य, पोषण आहारामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हि योजना सुरु करण्यात आली आहे. यासाठी दरमहा महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून आज उरणच्या तहसील कार्यलयाच्या सेतू कार्यालयात या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे उत्पन्नाचा दाखला, महाराष्ट्र अधिवास प्रमाण पत्र, हमीपत्र मिळविण्यासाठी सेतू कार्यालयात महिलांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.