• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सततच्या वाहतूक कोंडी विरोधात मनसेचा ११ ते १२ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा

ByEditor

Jul 2, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
तालुक्यातील खोपटा कोप्रोली, गव्हान फाटा, चिर्ले आणि दिघोडे या महत्त्वाच्या रस्त्यावर रात्री अपरात्री होणाऱ्या वाहतूक कोंडीचा सामना हा नाहक सर्वसामान्य प्रवाशांना तसेच नवीमुंबई परिसरात जाणाऱ्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अशा वाहतूक कोंडी पासून नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवार, दि. ११ जुलै २०२४ रोजी खोपटा कोप्रोली रस्त्यावर “रास्तारोको ” तसेच दिघोडे येथे शुक्रवारी १२ जुलै २०२४ रोजी रास्तारोको करण्याचा इशारा उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे तसेच नवीमुंबई पोलीस आयुक्त, कस्टम विभाग यांना देण्यात आलेल्या निवेदन पत्रकाद्वारे दिला असल्याची माहिती मनसेचे उरण तालुका अध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी दिली आहे.

उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास होत आहे. परंतु, उरण पुर्व विभागातील रहिवाशांच्या रहदारीच्या खोपटा, कोप्रोली, गव्हाण फाटा, चिर्ले , वेश्वी आणि दिघोडे रस्त्यावर रात्री अपरात्री बेधडकपणे अवजड वाहनांची रेलचेल सुरू असते,त्याचा त्रास हा सातत्याने सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.तसेच होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करणाऱ्या रुग्णांना विद्यार्थी प्रवाशांना ही सहन करावा लागत आहे.त्यात यार्ड गोदामात पार्किंगची व्यवस्था नसतानाही क्षमतेपेक्षा जास्त कंटेनरची हाताळणी हे व्यावसायिक करत असल्याने सदर रस्त्यावर व गोदामात बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. या सर्व जनतेच्या निगडीत समस्यांसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याने, मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश भाई ठाकूर यांच्या मार्गदर्शना खाली गुरुवार, दि. ११ ते शुक्रवार, दि. १२ जुलै रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा मनसेच्या वतीने मनसेचे तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांनी दिला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!