• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मापगांव येथे ४ जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

ByEditor

Jul 2, 2024

अब्दुल सोगावकर
सोगाव :
रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे व त्यांचे सहकारी तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुरुवार दि.४ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत मापगाव येथील धर्मशाळेत करण्यात आले आहे.

या शिबिरात मधुमेह व मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम याबाबत जनजागृती अभियान अंतर्गत समुपदेशन व मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डोळ्यांवर मांस वाढणे अथवा वेल येणे (टेरीजियम), अश्रूग्रंथी (लासुर), तिरळेपणा (सक्विंट) या नेत्रविकारांवर मोफत उपचार व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!