• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एसएससी बॅच 2002 तर्फे पिरकोन विद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

ByEditor

Jul 9, 2023

वैशाली कडू
उरण :
एसएससी बॅच 2002 तर्फे पिरकोन विद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ज्या समाजात जन्मास आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो, या उदार हेतूनेच ज्या शाळेत शिक्षण घेऊन आपण मोठे झालो. त्यानंतर चार पैसे कमवू लागलो त्याच कमाईचा छोटा हिस्सा आपल्या गरजू लोकांना देण्याचा संकल्प करत तब्बल 27 सदस्याने आपला मोलाचं योगदान देत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण मधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

या कार्यक्रम प्रसंगी जीवन गावंड चेअरमन, बल्लाल मॅडम प्राचार्य पुरण पाटील सर डाढाले बी.बी गावंड एस एस, सुशांत माळी सर तसेच या बॅच चे सदस्य रामनाथ पाटील,रोहित पाटील, सोनाली ठाकूर, स्वाती म्हात्रे, जीविता पाटील, गणेश पाटील, नितीन म्हात्रे, कुजवी पाटील,जितेश म्हात्रे, नितेश कोळी, योगेश कोळी यांनी कार्यक्रम यशस्वी होणास मदत केली. विद्यालयाने 2002 च्या सर्व बॅच मेंबरचे आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!