• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणच्या आर्यन मोडखरकरने पटकावले ५ स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण

ByEditor

Jul 9, 2023

वैशाली कडू
उरण :
येथील जलतरणपटू आर्यन मोडखरकर याने पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स येथे आयोजित जलतरण स्पर्धेत ५ सुवर्ण पदकाची लयलूट केली. या यशाबद्दल आर्यन मोडखरकर याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ऍक्वाटिक असोसिशन ऑफ रायगड यांच्या वतीने ‘कर्नाळा स्पोर्ट्स’, पनवेल येथे आज घेण्यात आलेल्या दुसऱ्या सब ज्युनियर जिल्हा ऍक्वाटिक चॅम्पिनशिप २०२३ मध्ये उरणचा आर्यन मोडखरकर याने पाच स्पर्धामध्ये भाग घेत पाचही स्पर्धेत सुवर्णपदकांची कामाई केली. यापूर्वीही आर्यन मोडखरकर याने मध्यप्रदेश मधील इंदौर मध्येही सुवर्णपदक मिळविले होते. तसेच इतर अनेक स्पर्धेत त्यानी सुवर्ण पदक मिळविले आहेत. आर्यनच्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!