• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला ८१ हजाराची लाच घेताना अटक

ByEditor

Jul 5, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे केलेल्या बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून ओंकार रामचंद्र अंबपकर (वय 55, धंदा-नोकरी, वित्त अधिकारी, नेमणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ वित्त विभाग, लोणेरे, माणगाव, रायगड रा. आनंद नगर, डी-103, लोणेरे, माणगाव, रायगड (वर्ग 1)) यास 81 हजाराची लाच घेताना रायगड लाच लुचपत विभागाने कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे डिप्लोमा विभागाच्या सभागृहाचे बांधकाम केले होते. तक्रारदार यांचे 19,42,838/- एवढ्या रकमेचे मंजूर केलेले बांधकाम बिल व 47,74,034/- एवढ्या रकमेचे बांधकाम बिल मंजूर करण्यासाठी एकूण रक्कम रुपये 1 लाख एवढ्या रकमेची लाचेची मागणी केली व तडजोडीअंती रक्कम रुपये 81,000/- स्वीकारण्याचे मान्य करीत लाच घेताना रायगड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश पाटील, सागर पाटील, अरूण करकरे आदींनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!