सोमवार, ८ जुलै २०२४
मेष राशी
दंतदुखी किंवा पोट बिघडण्यामुळे काही समस्या निर्माण होईल. ताबडतोब आराम पडावा यासाठी वैद्याकीय सल्ला घ्या. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटल ही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. मुलांसमवेत वेळ घालविणे महत्त्वाचे ठरेल. जे लोक तुमच्या प्रेमी पासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमीची आठवण त्रास देऊ शकते. रात्रीच्या वेळी प्रेमी सोबत तासन तास फोनवर बोलू शकतात. सहका-यांशी व्यवहार करताना चातुर्य वापरावे लागेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल.
भाग्यांक :- 5
वृषभ राशी
तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेनानीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल तितकेच तुमच्यासाठी चांगले असेल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील – तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. तुमच्या भागीदाराशी काहीही व्यवहार करणे, त्याच्याशी बोलणे कठीण होऊन बसेल. आज रात्री जीवनसाथी सोबत रिकामा वेळ घालावतांना तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या ताणामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होत होता. पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील.
भाग्यांक :- 4
मिथुन राशी
आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. कुणी जुना मित्र आज तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतो आणि जर तुम्ही त्यांची आर्थिक मदत केली तर, तुमची आर्थिक स्थिती थोडी तंग होऊ शकते. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील, तुमच्याभोवती सगळेच लुकलुकत असेल; कारण तुम्ही प्रेमात पडला आहात! गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.
भाग्यांक :- 2
कर्क राशी
आपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. या जगातली सर्वोच्च परमानंद हा दोन प्रेमात पडलेल्या व्यक्तींना मिळालेला असतो. होय, तुम्ही ते नशीबवान आहात. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे अथवा तुम्ही बॉसच्या नजरेत तुमची नकारात्मक प्रतिमा बनवू शकतात. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल.
भाग्यांक :- 6
सिंह राशी
अलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुमची काळजी आहे अशा लोकांशी व्यवस्थित वागा. रोमान्ससाठी अत्यंत उत्तेजनापूर्ण दिवस आहे. सायंकाळसाठी काही तरी खास योजना आखा, आणि आजची सायंकाळ जास्तीतजास्त रोमॅण्टीक करण्याचा प्रयत्न करा. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.
भाग्यांक :- 4
कन्या राशी
शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीनच कमकुवत बनवेल. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना दहा वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका. कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसºया कुणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको, अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल, त्यामुळे सावधानता बाळगा. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. या राशीतील जातक आज लोकांशी भेटण्यापेक्षा एकट्यात वेळ घालवणे अधिक पसंत करतील. आज तुमचा रिकामा वेळ घरातील सफाई करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुमचा/तुमची जोडीदार आज अत्यंत उत्साहपूर्ण असेल.
भाग्यांक :- 3
तुळ राशी
कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्ही कमालीचा आनंद मिळविण्यात मश्गूल व्हाल. त्यामुळे आज तुमचे कामाकडे लक्ष लागणार नाही. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.
भाग्यांक :- 5
वृश्चिक राशी
मित्राने दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल.
भाग्यांक :- 7
धनु राशी
आजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला ठेवतील. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवितो. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल.
भाग्यांक :- 4
मकर राशी
तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. आता गरजेच्या नसलेल्या वस्तुंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. जे स्वत:ला मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.
भाग्यांक :- 4
कुंभ राशी
आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल. आज धार्मिक कामात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकतात. या वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
भाग्यांक :- 2
मीन राशी
येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा, त्यातूनच तुम्हा आधिक ऊर्जा मिळेल. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्वकाही ठीक कराल. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कधीच नव्हतं, याची प्रचिती तुम्हाला येईल.
भाग्यांक :- 8