शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

महाडमध्ये सर्विस रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांना निमंत्रण; प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार?

महाड शहरातील सर्विस रोडलगत बंद अवस्थेतील वाहने आणि ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला असून, यापूर्वी जीवघेणा अपघात होऊनही दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संपादकीय मंडळ
शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ९:०६ ● ९४ वाचन (Views)
महाडमध्ये सर्विस रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांना निमंत्रण; प्रशासनाचे दुर्लक्ष कधी थांबणार?
जाहिरात (Advertisement)

बंद अवस्थेतील वाहने आणि ट्रकच्या विळख्यात रस्ते; यापूर्वी जीवघेणा अपघात होऊनही यंत्रणा सुस्तच

महाड (मिलिंद माने)

शहरातील सर्विस रोडलगत उभ्या करण्यात येणाऱ्या बंद अवस्थेतील वाहनांच्या आणि अवजड ट्रकच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्ते अडवून उभ्या असलेल्या या बेशिस्त वाहनांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून, वाहनचालकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दुचाकीस्वारांना कसरत; रात्रीच्या वेळी अपघाताची भीती

वाहनांच्या सुरक्षित आणि सुरळीत प्रवासासाठी असलेला सर्विस रोड सध्या खासगी वाहनमालकांचा पार्किंग अड्डा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा दीर्घकाळ बंद अवस्थेतील वाहने आणि अवजड ट्रक उभे करून ठेवले जात आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन दुचाकीस्वार व लहान वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी अंधारात उभ्या असलेल्या या वाहनांचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

जीवघेण्या अपघातानंतरही प्रशासन सुस्त

यापूर्वी शहरातील बुटाला पेट्रोल पंपाजवळ अशाच प्रकारे अनधिकृतपणे उभ्या असलेल्या ट्रकला धडकून झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. इतकी गंभीर दुर्घटना घडूनही प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतलेला नाही. आजही सर्विस रोडवर बिनदिक्कतपणे वाहने उभी केली जात असल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्रशासन आणखी एका बळीची वाट पाहत आहे का?

वाहतूक सुरळीत ठेवणे आणि अपघात रोखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने "आणखी एखादा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?" असा संतप्त सवाल महाडकर नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून सर्विस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवावे, धूळखात पडून असलेली बंद वाहने जप्त करावीत आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

बदलापूरच्या राणी यादव हिच्या शिरपेचात ‘मिस रायगड २०२६’चा मानाचा तुरा

स्वररंग पेण आयोजित १८ व्या पेण फेस्टिवलमध्ये रंगलेल्या ‘मिस रायगड २०२६’ सौंदर्य स्पर्धेत बदलापूरच्या राणी यादव हिने विजेतेपदाचा मानाचा मुकुट पटकावला असून, या दिमाखदार सोहळ्याला आमदार चित्रा वाघ यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

उरणमध्ये पाण्याचा खेळ की टँकरचा धंदा? रानसई धरण असूनही जनतेच्या घशाला कोरड!

उरण तालुक्यात रानसई धरण असूनही नागरिक आणि आदिवासी वाड्यांवर पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर दुसरीकडे कंटेनर यार्डमध्ये पाण्याची उधळपट्टी सुरू असल्याने प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराविरोधात संताप व्यक्त होत असून टँकर पुरवठ्यातील संभाव्य भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली जात आहे.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक; श्रीवर्धन भाजप तालुकाध्यक्षाला दिवेआगरमधून अटक

मुंबई महापालिकेत लिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४.५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी श्रीवर्धन तालुका भाजप अध्यक्ष आशुतोष पाटील यांना विलेपार्ले पोलिसांनी दिवेआगर येथून ताब्यात घेतले आहे.

भुवनेश्वर येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील उपोषणाचा तिसरा दिवस; मंगेश रावकर यांची प्रकृती खालावली

भुवनेश्वर (ता. रोहा) येथील कुंडलिका नदीपात्रालगतच्या अनधिकृत बांधकामाविरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस असून मंगेश रावकर यांची प्रकृती खालावली आहे; याप्रकरणी रोहा तहसीलदारांनी पाटबंधारे विभागाला बांधकाम तोडण्याचे पत्र दिले असून लोकप्रतिनिधींनीही तातडीच्या कारवाईचे निर्देश दिले आहेत.