रविवार, १ नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

माणगावच्या अन्नत्याग आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून दखल; भावनाताई घाणेकर यांच्या माध्यमातून साधला संवाद

रायगड जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू व्हावीत तसेच शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी माणगाव तहसील कार्यालयासमोर जाहीर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
मुख्य संपादक
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ | संध्याकाळी ८:५५ ● ३४३ वाचन (Views)
माणगावच्या अन्नत्याग आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून दखल; भावनाताई घाणेकर यांच्या माध्यमातून साधला संवाद
जाहिरात (Advertisement)

उरण (विठ्ठल ममताबादे)

रायगड जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, रोजगार हमी योजनेची कामे तत्काळ सुरू व्हावीत तसेच शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी माणगाव तहसील कार्यालयासमोर जाहीर अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष राजू मोहन रोडेकर आणि विधानसभा अध्यक्ष संताजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाची खासदार सुप्रिया सुळे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

उरणच्या नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. या प्रसंगी भावनाताई यांनी माणगावचे तहसीलदार विपिन लोकारे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांच्या तीव्र व्यथा व मागण्या त्यांच्या कानावर घातल्या. भावनाताईंच्या पुढाकारामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला आणि संबंधित उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून या सर्व मागण्या जिल्हाधिकारी व शासनापर्यंत तातडीने पोहोचविण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

दरम्यान, या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस उजाडला असला, तरी शासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. शेतकरी व शेतमजुरांच्या या न्याय्य हक्कांच्या लढ्याला भावनाताई घाणेकर यांनी आपला ठाम पाठिंबा दर्शविला असून, मागण्या मान्य होईपर्यंत या संघर्षात खंबीरपणे सोबत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

रायगड जिल्हा परिषद सभा वादळी; पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीवरून सदस्यांचा अध्यक्षांना घेराव

पनवेलमधील विसावा रिसॉर्ट येथे पार पडलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वितरणावरून आणि मनमानी कारभारावरून जोरदार खडाजंगी झाली. विकासकामांच्या प्रशासकीय मान्यता आदेशांच्या मूळ प्रती त्रयस्थ व्यक्तीच्या ताब्यात दिल्यावरून ठाकरे गटाच्या सदस्या पल्लवी भोईर आणि उरणच्या सदस्या प्रेरणा पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत अध्यक्षांना धारेवर धरले.

बायपासचे श्रेय लाटणाऱ्यांना २०२९ मध्ये उरणकरच बायपास करणार - नगराध्यक्षा घाणेकर

उरण बायपासच्या उद्घाटनावरून उरणमध्ये श्रेयवादाचे राजकारण तापले आहे. १८ वर्षांच्या संघर्षातून साकारलेल्या ५३ कोटी रुपयांच्या उरण बायपासचे श्रेय लाटणाऱ्यांना २०२९ च्या निवडणुकीत जनता राजकीय बायपास करेल, असा सज्जड इशारा उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी भाजप आमदार महेश बालदी यांचे नाव न घेता दिला. या बायपाससाठी १८ वर्षे संघर्ष करणारे 'उरण उत्कर्ष समिती'चे अध्यक्ष गोपाळ पाटील यांचा उद्घाटन सोहळ्यात नामोल्लेख न झाल्याने संतप्त नागरिकांनी बायपासवरच त्यांचा जाहीर नागरी सत्कार केला.

रायगडच्या सहकार क्षेत्रात कौशल्यविकासाचे नवे पर्व!

अलिबाग : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आणि रायगड जिल्हा ईएम-पॅक्स सहकारी संस्थांचा महासंघ मर्यादित (रामफेड), अलिबाग यांच्या वतीने सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कौशल्यविकासाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पाटणसई येथे मटका जुगारावर छापा, ५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त; नागोठणे पोलीस ठाण्याची कारवाई

नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसई स्टॉप येथील 'आराध्य जनरल व टी स्टोअर्स' दुकानामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगारावर पोलिसांनी यशस्वी छापा टाकला आहे.