कष्टकरी शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आजघडीला आत्महत्येची वेळ आली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन संपूर्ण रायगड जिल्हा तातडीने 'दुष्काळग्रस्त' जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे माणगाव तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून (दि. २८ ऑक्टोबर) बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
माणगाव (सलीम शेख)
कष्टकरी शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आजघडीला आत्महत्येची वेळ आली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन संपूर्ण रायगड जिल्हा तातडीने 'दुष्काळग्रस्त' जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे माणगाव तहसील कार्यालयासमोर बुधवारपासून (दि. २८ ऑक्टोबर) बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे. पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. २९ ऑक्टोबर) माणगाव येथे आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:
दुष्काळ जाहीर करणे: केवळ श्रीवर्धन नव्हे, तर रायगड जिल्ह्यातील उर्वरित सर्व १४ तालुक्यांतील परिस्थिती बिकट असल्याने संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.
आर्थिक मदत: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये, तर शेतमजुरांना तातडीने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी.
शैक्षणिक फी माफी: दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करावी.
चारा व पाणी व्यवस्थापन: कोकणातील उपलब्ध चारा आगीपासून (वळवा) वाचवण्यासाठी रोजगार हमी योजनेतून कापून त्याची साठवणूक करावी. तसेच ओढ्या-नाल्यांवर मातीचे बंधारे बांधण्यासाठी ग्रामसभा घेऊन एनसीसी (NCC) व एनएसएस (NSS) च्या माध्यमातून श्रमदानाची कामे राबवावीत.
खर्चात कपात: कुंभमेळ्यावरील अवाढव्य खर्च कमी करून तो निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वर्ग करावा.
परिच्छेद मजकूर...
आंदोलनादरम्यान नेते आक्रमक
प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, "शासनाने केवळ श्रीवर्धन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून उर्वरित जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या सरकारविरुद्ध आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील."
तसेच पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सज्जाद डावरे यांनी, "शासनाने गरीब शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे," असा आरोप करत जोपर्यंत भरीव मदत मिळत नाही, तोपर्यंत पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभा राहील असा इशारा दिला.
आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थिती व पक्षात पक्षप्रवेश
या अन्नत्याग आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सज्जाद डावरे, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष संताजी पवार, माणगाव तालुकाध्यक्ष राजू रोडेकर, महाड तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ, तळा तालुकाध्यक्ष अजहर कुरुक्कर, अलिबाग तालुकाध्यक्ष साईनाथ म्हात्रे, महिला पदाधिकारी अश्विनी ठाकूर, अलिबाग तालुका महिला अध्यक्ष स्नेहा पाटील, अलिबाग-मुरुड विधानसभा अध्यक्ष सचिन पाटील, अबूबकर गोडमे, मकसूद हरगे, प्रवीण जाधव आणि रामदास कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, या आंदोलनस्थळी सणसवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नामदेव लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.