मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट: "अजितदादा हयात असते तर, १२ फेब्रुवारीलाच राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते"

"अजितदादा हयात असते तर १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते," असा मोठा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
मुख्य संपादक
शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ | संध्याकाळी ६:३८ ● ४७० वाचन (Views)
सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट: "अजितदादा हयात असते तर, १२ फेब्रुवारीलाच राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते"
जाहिरात (Advertisement)
मुंबई (प्रतिनिधी)

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या नुकत्याच झालेली ब्रीच कँडी रुग्णालयातील भेटीमुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. "दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे केव्हाच विलीनीकरण झाले असते आणि १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष एकत्र आले असते," असा मोठा गौप्यस्फोट तटकरे यांनी केला आहे.

जाहिरात (Advertisement)
काय म्हणाले सुनील तटकरे?

सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसली, तरी या प्रक्रियेची पार्श्वभूमी अजितदादांच्या काळातच तयार झाली होती, असे तटकरेंनी स्पष्ट केले. अजितदादांनी स्वतः आपल्याला या विलीनीकरणाची कल्पना दिली होती, असा दावाही त्यांनी केला. जर आज अजितदादा असते, तर येत्या १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकत्र आले असते आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध दिसली असती; परंतु अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ही संपूर्ण प्रक्रिया मागे पडल्याचे तटकरे यांनी नमूद केले.

अजितदादांच्या निधनानंतर चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२७ रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांच्या निधनाच्या काही दिवसांनंतरच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात याविषयी चर्चा झाल्याचा दावा काही नेत्यांनी केला होता, जरी अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी त्यावेळी तो प्रस्ताव फेटाळला होता. आता शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या ताज्या भेटीनंतर या चर्चांना पुन्हा तोंड फुटले आहे.

शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया

सुनील तटकरे यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे यांनी सत्य बाहेर आणल्याबद्दल आपण त्यांचे आभारी असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

तटकरेंच्या या खळबळजनक दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, आगामी काळात राजकीय वर्तुळात काय नवीन घडामोडी घडतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: मिनाक्षी शिंदे यांचा ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा

ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात नाव जोडले गेल्यानंतर आणि सतत होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या ज्येष्ठ नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी आपल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.