सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६ | सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ
ब्रेकिंग न्यूज

उरणमध्ये तरुणाला पेट्रोल टाकत जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अवघ्या २४ तासांत दोघांना अटक

जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना उरण-चिरनेर परिसरात घडली. या गंभीर गुन्ह्याची तातडीने दखल घेत उरण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
मुख्य संपादक
रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ | संध्याकाळी ६:२७ ● ४३२ वाचन (Views)
उरणमध्ये तरुणाला पेट्रोल टाकत जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अवघ्या २४ तासांत दोघांना अटक
जाहिरात (Advertisement)

उरण पोलीस ठाण्याची कारवाई; गुन्हे प्रकटीकरण पथकास यश

उरण (अनंत नारंगीकर)

जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करत त्याला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना उरण-चिरनेर परिसरात घडली. या गंभीर गुन्ह्याची तातडीने दखल घेत उरण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अष्टांग पाटील आणि ऋतिक पांडुरंग चाळके, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमकी घटना?

फिर्यादी तरुण गुरुवारी (दि. २२) नेहमीप्रमाणे आपल्या मोटारसायकलवरून घरी जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग केला. रस्त्यात त्याला अडवून हातातील कोयत्यासारख्या लोखंडी हत्याराने त्याच्या डोक्यावर पाच ते सात वार करत त्याला खाली पाडले. त्यानंतर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर ओतून, जिवंत जाळण्याच्या उद्देशाने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेने उरण परिसरात एकच खळबळ उडाली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी उरण पोलिसांना तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सहआयुक्त दीपक साकोरे, अपर आयुक्त प्रमोद शेवाळे, उपायुक्त अमित काळे आणि सहायक पोलीस आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी विशेष पथкаची स्थापना केली.

पोलीस निरीक्षक राहुल काटवानी यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून दोन्ही आरोपींना २४ तासांच्या आत नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी पदभार स्वीकारल्यापासून अशा गुंतागुंतीच्या आणि विनापुराव्याच्या गुन्ह्यांची उकल करण्याची ही पाचवी मोठी कामगिरी ठरली असून, त्यांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक गोविंद केंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक भरत पाटील, वैभव रोंगे, पोलीस उपनिरीक्षक रोशन काथारा, पोलीस हवालदार जयंत घरत, शशिकांत घरत, किशोर फंड, पोलीस नाईक अनिल मानकर, गंगाराम कचरे, पोलीस शिपाई रियाज शेख आणि बसवराज सकपाळ यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत.
जाहिरात (Advertisement)
ही बातमी आवडल्यास नक्की शेअर करा!

संबंधित बातम्या (Related News)

नागोठणे येथे ‘ए सेवेन स्टुडिओ’चा भव्य शुभारंभ!

महिलांच्या फॅशनविश्वात नवनवीन ट्रेंड्स, आकर्षक डिझाइन्स आणि दर्जेदार कपड्यांची मेजवानी घेऊन ‘ए सेवेन स्टुडिओ – Exclusive For Women’ या महिलांसाठीच्या विशेष फॅशन स्टुडिओचा भव्य शुभारंभ नागोठणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; पुई हद्दीत टाटा कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पुई गावच्या हद्दीत इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर रविवारी (२५ ऑक्टोबर) दुपारी १ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी व भीषण अपघात घडला.

रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांकडून रायगड जिल्हा बँकेच्या कार्याचे कौतुक

पेण येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित बँकिंग सुविधा, आर्थिक साक्षरता आणि विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भातील कार्यक्रमात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.