• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

डॉ. पतंगराव कदम आर्ट्स व कॉमर्स कॉलेज पेणच्या प्रभारी प्राचार्य पदी डॉ. मुरलीधर वाघ

ByEditor

Jul 13, 2024

विनायक पाटील
पेण :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित डॉ. पतंगराव कदम आर्ट्स व कॉमर्स कॉलेज पेण येथे कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एम. एस. वाघ यांची प्रभारी प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्था आदेशानुसार डॉ.पतंगराव आर्ट्स व कॉमर्स कॉलेजमध्ये ते गेली सहा वर्षे कॉमर्स विभागाचे विभागप्रमुख व कॉमर्स या विषयाचे अध्यापन करत आहेत. डॉ. एम .एस. वाघ यांनी मुंबई विद्यापीठांतर्गत एक लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केला असून, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन पेपर प्रकाशित आहेत. कॉमर्स विभागामध्ये गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी आपल्या सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महाविद्यालयाच्या नॅकसाठी मुरलीधर वाघ यांचे मार्गदर्शन मौलिक पद्धतीचे राहिलेले आहे व येणाऱ्या नॅकमध्ये दर्जा वाढवण्याचा प्रयत्न राहील. तसेच महाविद्यालयात विद्यार्थी गुणवत्ता व कौशल्य विकास वाढविण्यासाठी नेहमी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन नवनियुक्त प्रभारी प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच या महाविद्यालयाचे माझी प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे व संस्थेचे पदाधिकारी उत्तम गलांडे सर, प्रकाश हाके सर, संजय महाजन सर व एस. एस. पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले व मिळत राहील अशी अपेक्षा प्रभारी प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ यांनी व्यक्त केली आणि संस्थेने या पदाची धुरा सांभाळण्यासाठी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल संस्थेचेही आभार मानले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!