रायगड : जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील महाड,पोलादपूर व माणगाव या तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार दि. १५ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
