आरोग्याच्या दृष्टीने तलाव व परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व संस्थानी व नागरिकांनी एकत्र येणे गरजेचे -डॉ. राजाराम हुलवान
प्रतिनिधी
अलिबाग : ‘माझे स्वच्छ व सुंदर तलाव’ या अभियानांतर्गत नुकतेच अलिबाग येथील हिराकोट तलाव व परिसर स्वच्छ मोहीम भर पावसात देखील यशस्वीरित्या संपन्न करण्यात आली. यावेळी अनेक सामाजिक संस्थांनी एका सामाजिक भावनेतून एकत्र येवून हिराकोट तलाव, कलेक्टर कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय येथील परिसर माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हूलवान यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ केला. यावेळी अलिबाग नगरपरिषद, रायगड पोलीस, माणुसकी प्रतिष्ठान, तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक संस्था,उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था, तहसील कार्यालय, रायगड मेडिकल असोसिएशन, अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन, रायगड पत्रकार, अलिबाग प्रेस फोटोग्राफर असोसिएशन, निसर्ग सुंदर थळ संस्था, प्रिझम सामाजिक विकास, स्पर्धा विश्व अकॅडमी, लायन्स क्लब मांडवा, रोटरी क्लब अलिबाग, रोट्रॅक्ट अलिबाग, लायन्स डायमंड क्लब, सुरभी स्वयंसेवी संस्था व इतर सामाजिक स्वयंसेवी संस्था, तसेच शाळा, कॉलेजची मुले, नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपला परिसर स्वच्छ ठेवणे तसेच आपल्या परिसरातील काही पर्यटन स्थळ असतील तर ती स्वच्छ ठेवणे हे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे या अभियाना अंतर्गत प्रत्येक गावातील तलाव व परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून लोकसहभाग व परिसरातील संस्थांच्या सहभाग घेणे आवश्यक असल्याचे सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे यांची टीम तसेच जन शिक्षण संस्था रायगड अध्यक्ष डॉ. नितीन गांधी, रायगड मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, लायन्स मांडवा अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, लायन्स डायमंड अध्यक्ष व तेजस्विनी फाउंडेशन विश्वस्त पदाधिकारी डॉ. रेखा म्हात्रे, तेजस्विनी फाऊंडेशन अध्यक्षा जिविता पाटील, रोटरी अलिबाग सेक्रेटरी अंकुश पाटील व सदस्य तन्वी शेट्ये, सुरभी संस्था बिभीषण जेधे, तालुका क्रिकेट असोसिएशन संदीप जोशी, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था संचालक रोशन पंडित, सहजानंद ज्येष्ठांचे होस्टेल समन्वयक कुमार ठाकूर, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन सचिव विकास पाटील, प्रीझम संस्था विश्व अकॅडमी अध्यक्ष तपस्वी गोंधळी, सरस नर्सिंग होम डॉ. राकेश सिंग, अलिबाग मुरुड मेडिकल असोसिएशन सदस्य तसेच प्रयास हॉस्पिटल कार्लेखिंड डॉ. रविंद्र म्हात्रे, लायन्स मांडवा माजी अध्यक्ष अभिजीत गुरव, उपाध्यक्ष ऋग्वेद ठाकूर, योग तज्ञ कुमार जोगळेकर, निसर्ग सुंदर थळ सेक्रेटरी योगेश घरत, माणुसकी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष व रायगड पोलीस तानाजी आगलावे, सदस्य ऋषिकेश वाडकर, एकनाथ राठोड, वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ इंडिया आनंद राठोड, वरिष्ठ प्रबंधक बँक ऑफ इंडिया अलिबाग शाखा अमोल गडाख आदी मान्यवर मंडळींनी या स्तुत्य उपक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित राहून उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.