गणेश पवार
कर्जत : तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत होत्या. उल्हास नदी पात्रात एक मृतदेह सापडून आला असुन, सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असुन मृत व्यक्ती ही कर्जत तालुक्यातील गौरकामत गावातील असल्याचे समोर आले आहे.
सध्या कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले हे दुथडी भरून वाहत आहेत. सोमवार, दि. १५/०७/२०२४ रोजी बेंडसे गाव हद्दीतील उल्हास नदी पात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह सापडला असुन, सदर घटनेची खबर कर्जत पोलीस ठाण्यात मिळताच कर्जत पोलीस घटनास्थळी हजर होऊन सदर घटनेचा तपास केला असता, सदर मृत व्यक्तीची ओळख पटली असुन सदर मयत व्यक्तीचे नाव बाळु रतन पवार (वय ५०) असे असुन, रा. डोणेवाडी गौरकामत, ता. कर्जत, जि. रायगड येथील राहणारा आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला असुन, शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर सदर घटनेची नोंद कर्जत पोलीस ठाणे येथे अ. मृ. र. नं. ३९/२०२४ बीएनएस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.