शशिकांत मोरे
धाटाव : प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यांची समस्या लक्षात घेत रोहा लायन्स क्लबच्यावतीने लांढर येथील विद्यार्थ्यांना दप्तर व आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहावयास मिळाला.
वाशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सतिश भगत यांनी निरुदीन रोहावाला व लायन्स क्लबचे अध्यक्ष ममने यांच्याकडे शैक्षणिक साहित्याची समस्या बोलून दाखविली होती. क्लबच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर आणि वह्यांचे यासमयी वाटप करण्यात आले. याप्रसंगी शंकरराव भगत, अनिल भगत, निरुदीन रोहावाला, जुमाना रोहावाला, सतिश भगत, अनघा माने, संपदा देशपांडे, सुष्मिता शितालकर, वर्षा सातपुते, गितेश भगत, नारायण चितळकर यांच्यासह शिक्षक वर्ग उपस्थित होते.