शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप
विनायक पाटील
पेण : पेण तालुका 40+ अध्यक्ष सतीश पाटील यांनी हनुमानपाडा येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष मुकेश भंडारी, सचिव प्रमोद पाटील, खजिनदार संजय भंडारी, विजय भंडारी, 40+ रायगड जिल्हा अध्यक्ष अण्णा गावडे, समाजसेवक सुदर्शन पाटील, अनिकेत पाटील, विवेक पाटील, सागर पाटील यांनी उपस्थिती दर्शविली होती.
क्रिकेट स्पर्धा ही फक्त मनोरंजनासाठी नसून आपण त्यातून सामाजिक बांधिलकी जपू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण सतीश पाटील यांनी या स्पर्धेच्या वेळी दाखवून दिले आहे. या स्पर्धेतून सतीश पाटील यांच्या माध्यमातून हनुमानपाडा येथील दिव्यांग कन्या कीर्ती अनिल म्हात्रे हिला मुकेश भंडारी व अण्णा गावडे यांच्याकडून 16000 रुपयांची मदत करण्यात आली तसेच हनुमानपाडा येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. क्रिकेट स्पर्धेतून हा स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल हनुमानपाडा ग्रामस्थ व क्रिकेट प्रेमी यांनी सतीश पाटील यांचे कौतुक केले आहे.
हनुमान पाडा येथील दिव्यांग कन्येला 16 हजार रुपयांची मदत व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्याबद्दल सतीश पाटील यांनी मुकेश भंडारी, अण्णा गावडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
