किरण लाड
नागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयापासुन ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्याला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक हभप सिताराम उर्फ अण्णा बापूजी रावकर मार्ग असे नाव देण्यात आलेले आहे.
ग्रामपंचायत नागोठणे यांच्या वतीने आयोजित केलेला नामकरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज नागोठणे येथे पार पडला. यापुढे ग्रामपंचायत कार्यलय ते ज्ञानेश्वर मंदिरापर्यंतच्या रस्त्याला स्वातंत्र्यसैनिक सिताराम (अण्णा) बापूजी रावकर मार्ग या नावाने संबोधले जाईल, अण्णांबद्दल सांगायचे म्हणजे अण्णा हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक होते. त्यांची जन्मभुमी, कर्मभूमी नागोठणे गाव, गावाचा, लोकांचा विकास कसा होईल यासाठी अण्णांनी परिश्रम घेतले होते. गावात वारकरी संप्रदयाचा पाया रोवुन, संत ज्ञानेश्वर मंदिराची स्थापना नागोठणेसह विभागातील सहकाऱ्यांना सोबत घेऊन केली होती. अण्णांच्या या सामाजिक, धार्मिक कार्याची दखल घेऊन या रस्त्याचे नामकरण करुन अण्णांच्या कार्याचा सन्मान नागोठणे ग्रामपंचायतीने केला आहे.

या नामकरण सोहळ्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर जैन, ग्रामपंचायत सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक, उपसरपंच रंजना राऊत, ग्रामसेवक राकेश टेमघरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, वारकरी संप्रदायातील मान्यवर, अण्णांची मुले, मुली, नातेवाईक, रावकर कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.