घन:श्याम कडू
उरण : उरण तालुक्यातील धाकटी जुई गावचे सुपुत्र व ग्रामविकास अधिकारी सी. डी. घरत यांचे पुत्र पियुष चंद्रशेखर घरत याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उरण तालुक्याचे व आगरी समाजाचे नाव उज्जवल केले आहे. या यशाबद्दल पियुष घरत याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यात आपल्या भागातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे स्पर्धेत उतरण्यास कचरतात. परंतु उरण तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील पियुष घरत याने या स्पर्धेत उतरून मोठ्या हिंमतीने यशस्वीपणे अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा पास झाला आहे. उत्तीर्ण होऊन पियुष घरत यांची सहाय्यक नगररचनाकार श्रेणी १ गट ब या पदावर निवडही झाली आहे. वडील चंद्रशेखर घरत व आई वृषाली घरत यांच्यासह शिक्षक व नातेवाईकांच्या प्रोत्साहनमुळेच यशाची पायरी गाठू शकलो असे पियुष याने सांगितले.
पियुषाच्या या यशाने उरण तालुक्यासह धाकटी जुई व आगरी समाजाचे नावही उज्जवल झाले आहे. पियुषच्या या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.