• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

म्हसळा येथे सोनोग्राफी केंद्र सुरू

ByEditor

May 19, 2023

महिलांचा माणगाव व मुंबई जाण्याचा खर्च वाचणार

संजय प्रभाळे
बोर्लीपंचतन :
म्हसळा येथील डॉ करंबे दाम्पत्याकडून सोनोग्राफी सुविधा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 15) पासून या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. म्हसळा एसटी स्टँडजवळ हे सोनोग्राफी केंद्र खुले करण्यात आले आहे. याचा लाभ आता अनेक महिलांना होणार आहे.

म्हसळा येथे शिक्षण झालेले डॉ. अलंकार करंबे हे भुलतज्ञ असून त्यांच्या पत्नी डॉ. सोनाली या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. डॉ. सोनाली यांनी म्हसळा बाजारपेठेत प्रसुतीगृह हॉस्पिटल सुरू केले व नुकतेच त्यांनी सोनोग्राफी केंद्र देखील सुरू केले. श्रीवर्धन व म्हसळा येथील अनेक महिला रुगांना माणगाव येथे सोनोग्राफी व स्त्रीरोग उपचारासाठी माणगाव व मुंबईत जावे लागायचे मात्र हे सोनोग्राफी व स्त्रीरोगतज्ज्ञ हे म्हसळ्यात उपलब्ध असल्याने अनेक महिलांना रुग्णांचा प्रवासखर्च व वेळेची बचत होणार आहे. याशिवाय गरोदर महिलांना प्रवास करू देने हे देखील धोकादायक होते. अत्यंत माफक दरात ही सोनोग्राफी सुविधा असणार आहे. सोनोग्राफी, नॉर्मल व सिझरीयन डिलिव्हरी, वंध्यत्व निवारण, मासिक पाळी आजार, गर्भपिशवी आजार व ऑपरेशन तसेच नसबंदी इत्यादि आजारांवर उपचार होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्रीवर्धन व म्हसळा परिसरात अशा अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सुरू होत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!