विठ्ठल ममताबादे
उरण : दि . 10/7/2023 रोजी सकाळी 9 वाजता उरण तालुक्यातील रानसई आदिवासीवाडी येथे काही कामानिमित्त जात असताना जंगलातील रस्त्याच्या बाजूला झाडाचा आधार घेत शांत बसलेला मोठा मोर निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी म्हणून परिचित असलेल्या राजू मुंबईकर यांना दिसला. राजू मुंबईकर त्या मोराच्या जवळ गेले असता तो उडत नव्हता. कर्नाळा आरएफओ राठोड यांना याबाबत राजू मुंबईकरांनी कल्पना दिली आणि तत्काळ फॉरेस्टर वारगे यांना पाठविण्यात आले. तातडीने मोराला मेडिकलसाठी नेले असता त्याच्यावर उपचार करून त्याला आराम द्यायला सांगितले आणि त्याची रवानगी लगेच कर्नाळा पक्षी अभयारण्यात करण्यात आली आहे. सध्या तो मोर सुखरूप आहे.

मोराचे प्राण वाचविल्याने सर्व फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी केअर ऑफ नेचरच्या सर्व रेस्क्यू टीमचे आभार मानले. वेळेवर उपचार मिळाल्याने मोर वाचल्याने केअर ऑफ नेचर या सामाजिक व निसर्गप्रेमी संस्थेचे संस्थापक व महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी आरएफओ राठोड यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्था महाराष्ट्रचे सचिव विलास ठाकूर, आरएफओ राठोड, फॉरेस्टर वारजे उपस्थित होते.