मिलिंद माने
महाड : तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाळण खुर्द येथील शेतकरी गुरे आणण्यासाठी नदीपात्रात गेला असता पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली
महाड तालुक्यात मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून दुर्गम भागात मुसळधार स्वरूपात पाऊस पडत असून या पावसाच्या पाण्यात पाळीव जनावरे रानातून घरी आणण्यासाठी गेलेल्या बालाजी नारायण उत्तेकर (वय 65) या शेतकऱ्याचा वाळण खुर्द येथील रेडे वाहाळ या ओढ्यामध्ये पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेल्याने मृत्यू झाल्याची घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.