विनायक पाटील
पेण : बऱ्याच वेळेला आपण झाडे लावतो पण त्या झाडांची निगा न राखल्याने ती कोमेजून जातात. भले आपण कमी झाडे लावा पण त्यांची निगा राखणे गरजेचे आहे, तरच झाडांची वाढ होऊ शकते असे वक्तव्य हमरापुर येथे वृक्षारोपण कार्यक्रमात मास्टर ऑफ लंडन आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांनी केले.

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी, पर्यावरण विभाग आणि वन विभाग बेलवडे यांच्या विद्यमाने हमरापूर विभाग येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नंदा म्हात्रे, पेण तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक मोकल, बळी म्हात्रे, राजन झेमसे, राजू म्हात्रे, नितीन पाटील तसेच पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विविध प्रकारचे वृक्षारोपण करण्यात आले.
