विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावातील तरुण रुपेश नंदा पवार (३८) याचे दि. १७ जुलै २०२४ रोजी अल्पशा आजाराने आकस्मित निधन झाले. रुपेश स्वभावाने अतिशय जिद्दी व प्रेमळ असल्याने सर्वांना परिचित होता. त्याच्या आकस्मित जाण्याने पवार कुटूंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
त्याच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याच्या अंत्यदर्शनासाठी नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक व समस्त गोवे ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, आई, वडील, भाऊ, भावजय, चुलते असे मोठे पवार कुटुंब आहे. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार, दि. २६/७/२०२४ रोजी तर उत्तरकार्य विधी रविवार, दि. २८/७/२०२४ रोजी त्यांच्या निवास्थानी होणार आहेत.