रायगड : भारतीय हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार, 26 जुलै 2024 रोजी रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हयातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचे आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना 26 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहिर केली आहे.

याबाबतचे अधिकृत परिपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत काढण्यात आले आहे. तरी उद्या दि. २६ जुलै २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये बंद राहतील.
