पोलिस प्रशासनाने मानले आभार
विनायक पाटील
पेण : आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी वाटप करण्याची संकल्पना मनात आणून शिवसेनेचे पेण विधानसभा सह समन्वयक समीर म्हात्रे यांनी पेण तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी लागणारे विविध प्रकारच्या साहित्याचे किट वाटप करून पेण तालुका शिवसेनेच्यावतीने एक वेगळा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन पेण शिवसेनेच्या माध्यमातून पेण तालुक्यातील पेण, जोहे, वडखळ या पोलिस स्टेशनमध्ये हे किट जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली वाटप केले. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह जिल्हा समन्वयक नरेश गावंड, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, विभागप्रमुख गजानन मोकल, नंदू मोकल, चंद्रहास म्हात्रे, राजू पाटील, अंबिवली माजी सरपंच गणेश पाटील, भगवान म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष साईराज कदम, प्रसाद देशमुख, ओमकार दानवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते. त्यामुळे अशा मुसळधार पावसात प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कीतीही सज्जता ठेवली तरी ती अपुरी पडत असल्याचा विचार करून आजचा कारगिल दिन आणि उद्याचा उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस लक्षात घेऊन पक्षाच्या माध्यमातुन पेणमधील प्रत्येक पोलिस ठाण्यात लाईफ सेविंग ईक्विपमेंट म्हणुन लाईफ जॅकेट, लाईफ बोया रिंग, क्यारीबिनर आणि रोप अशा प्रकारचे साहित्य पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलिस निरीक्षक प्रसाद पांढरे आणि जोहे पोलिस निरीक्षक नागेश कदम यांच्याकडे सुपूर्त केले.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम आमच्या कधीच मनात आला नव्हता. पोलिसांकडे अशा प्रकारचे साहित्य अत्यावश्यक आहे आणि हे साहित्य अनेक वर्षे टिकून उपयोगी पडणारे असल्याने त्याचा फायदा आपत्तीग्रस्तांसाठी होऊ शकतो असे सांगितले. तर समीर म्हात्रे यांनी हा एक असा उपक्रम आहे की, या साहित्याच्या माध्यमातून एखाद्या आपत्तीग्रस्ताचे जरी प्राण वाचले तरी त्याचे आशीर्वाद आमचे नेते उध्दव ठाकरे आणि आम्हा सर्वांना मिळतील आणि त्यातुन आम्ही धन्य होऊ, नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासनाने याचा पुरेपूर वापर करावा असे सांगितले. तर एखादी घटना घडली तर सर्वप्रथम पोलिसांना घटनास्थळी जावे लागते. त्यामुळे अशा प्रकारचे साहित्य खरे पाहता आमच्या पोलिस ठाण्यात अत्यावश्यक आहे आणि तेच साहित्य आज समीर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आमच्या पर्यंत पोहोचले आहे. याचा आम्ही पुरेपूर वापर करू असे पेणमधील तिनही पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी सांगितले.