अनंत नारंगीकर
उरण : वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते विजय नारायण पाटील (वय ५२) या तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजारांने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) घडली आहे. विजय पाटील यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रहिवाशांना डेंग्यूने ग्रासले होते. त्यातच वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते विजय नारायण पाटील (वय ५२) या तरुणाचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी (दि. २०) घडली आहे. विजय पाटील हे वेश्वी गावातील दानशूर व्यक्ती तथा माजी सरपंच विलास पाटील यांचे धाकटे बंधू आहेत. विजय पाटील या शांत, प्रेमळ, मनमिळाऊ स्वभाव असणाऱ्या व सामाजिक क्षेत्रात हिरीरीने सहभाग घेणाऱ्या तरुणाचा मृत्यू डेंग्यू सदृश्य आजारांने झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.