• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण हादरले! बेपत्ता यशश्री शिंदेचा मृतदेह कोटनाक्याजवळ सापडला

ByEditor

Jul 27, 2024

शवाची अवस्था पाहून प्रत्यक्षदर्शींना धक्का!

अक्षता म्हात्रे प्रकरण ताजे असतानाच यशश्रीसोबत घडले भयानक अघटित

घनःश्याम कडू
उरण :
रायगड तसेच नवी मुंबई परिसरात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे धाकच राहिला नाही का? असा प्रश्‍न पडावा अशा निंदनीय घटना या भागात घडत आहेत. नवी मुंबईच्या बेलापूरमधील विवाहित अक्षता म्हात्रे हिचे मंदिरात तिघा पुजार्‍यांनीच चारित्र्यहनन केले. त्यानंतर तिला अत्यंत वेदनादायी मृत्यू देण्यात आला. अक्षता म्हात्रेला न्याय मिळावा, तिच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी आद्यपही समाज आणि विविध संघटना लढत असतानाच आता संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना रायगडमधील उरण तालुक्यात घडली आहे.

उरणमध्ये कोटनाका पेट्रोल पंपाजवळ एका 22 वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला आहे. उरणमधील एन. आय. स्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे हिचे हे शव असल्याची माहिती प्रथमदर्शनी समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतदेहाची अवस्था पाहून यशश्रीला संपवणारा मारेकरी किती निर्दयी आणि अमानुष असावा याची कल्पना यावी. यशश्रीचे शव सापडले तेव्हा तिच्या पोटावर तसेच संपूर्ण अंगावर असंख्य वार केल्याचे आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांमार्फत देण्यात आली आहे. तिच्या शवाची अमानुषरीत्या विटंबना करून तिला रस्त्यात बेवारसरित्या फेकून दिले असल्याचे प्रत्यक्षदर्शींमार्फत सांगण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत यशश्रीचा मृतदेह इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये नेला असून पुढील तपास सुरु आहे. यशश्री गुरुवार, दि. 25 जुलैपासून बेपत्ता होती. ती कुठे होती, कोणत्या अवस्थेत होती, याबाबत तिच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती नव्हती. त्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्याबाबत पोलीस तपास सुरु होता. मात्र ती सापडली ते थेट मृतावस्थेतच. त्यामुळे उरणमध्ये प्रचंड संताप आणि आक्रोश व्यक्त केला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!