अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रविवार, दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
यासाठी मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी मापगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सानिका घाडी व सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी ग्रामपंचायतीकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. त्यावेळी मापगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच उनीता थळे यांनी सदर प्रस्ताव मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांनी केलेल्या सूचनेनुसार ग्रामपंचायत शेष फंडातून स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते.
सदर मूनवली येथील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी मापगाव ग्रामपंचायत माजी सदस्य चंद्रकांत खोत, अनिल जाधव, किशोर सातमकर, संजय शिंदे, लाईक कप्तान, माजी सदस्या सानिका घाडी, बहिरोळे पोलिस पाटील प्रफुल्ल थळे, आत्माराम पंडम, बाळाराम थळे, गोविंद अनमाने, मधुकर सूद, दिलीप मोंढे, सामाजिक कार्यकर्ते सतिश घाडी, सचिन घाडी, राजेंद्र घरत, सूचित थळे, संतोष बांद्रे, मनिष खाडे, शैलेश तिर्लोटकर सर, अजित हरवडे सर, राकेश पवार, संजय अनमाने, अशोक मोंढे, गितेश ठकरुळ, मुनावर कुर, साहिल कुर, रुस्तुम कुर, नितेश ठकरुळ, प्रसाद मसुरकर, सुयोग अनमाने, रोशन अनमाने, अनिल अनमाने, प्रविण घाडी, निलेश नागावकर, अक्षय नागावकर, निकेश अनमाने, मयूर अनमाने तसेच अहिल्या अनमाने, वडे काकी, प्रणिता अनमाने, वर्षा अनमाने यांच्यासह महिला मंडळ मूनवली व मूनवली येथील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.