औद्योगिक वसाहतीमधील कामगार व वाहन चालकांकडून संतप्त प्रतिक्रिया
मिलिंद माने
महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांना खड्डे पडले असून औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांमुळे संपूर्ण औद्योगिक वसाहतीतील रस्त्याची चाळण झाली आहे सध्या परिस्थितीत डांबरीकरणाचा असणारा रस्ता व त्यावर पडलेले खड्डे म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी स्थिती या रस्त्याची झाल्याने व काँक्रिटीकरणाचे काम मंजूर होऊन देखील चालू न झाल्याने वाहन चालकांसहित कामगार वर्गांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महाड औद्योगिक वसाहती मधील रस्ता यापूर्वी डांबरीकरणाने केलेला होता मात्र दरवर्षी डांबरीकरणाच्या कामावर लाखो रुपये खर्च होऊन देखील पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था जैसे थे होत असल्याने व अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची दरवर्षी होणारी Establish पाहता या रस्त्याच्या पुन्हा एकदा नूतनीकरण करून डांबरीकरण करण्यासाठी कामासाठी लाखो रुपये मंजूर झाले होते मात्र पुन्हा हा रस्ता खड्ड्यात जाणार या त्यापेक्षा काँक्रिटीकरण केलेले बरे असे उशिरा शहाणपण औद्योगिक औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुचले व त्यांनी डांबरीकरण आयोजित काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर केला मात्र मार्क महिन्यात काँक्रिटीकरण कामाचा प्रस्ताव मंजूर होऊन देखील प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात या मार्गावरून जाणाऱ्या कामगारांना व वाहन चालकांना चालू वर्षाच्या पावसाळ्यात खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये कायम रासायनिक कंपन्याचा माल घेवून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच पद्धतीने कंपनी कामासाठी येणाऱ्या कामगारांच्या वाहनांची व नागरिकांची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने यासह औद्योगिक वसाहतीतून ग्रामीण भागात जाणाऱ्या ग्रामस्थांची वाहने देखील याच रस्त्यावरून मार्गक्रमण करीत असतात परिणामी यांची देखील वर्दळ कायम असते. नांगलवाडी ते बिरवाडी हा रस्ता महाड औद्यागिक विकास महामंडळ यांच्या ताब्यात आहे. देखभाल दुरुस्तीवर प्रतिवर्षी यावर लाखो रुपये खर्च होतो. मात्र या पावसाळ्यात या रस्त्यांवर काही ठिकाणी एक एक फुटाचे काही ठिकाणी दोन दोन फुटाचे खड्डे जाईल असे खड्डे पडले आहेत. याठिकाणी असलेल्या कारखान्यांचा माल घेवून येणारी वाहने हि कित्येक टन वजनाची असतात. अवजड वाहनांच्या क्षमतेनुसार रस्ता बनवणे गरजेचे असताना केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी औद्योगिक विकास महामंडळाचा पैसा पाण्यात घालवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आज औद्योगिक वसाहती मधील रस्त्याची दुरावस्था झाली आहे याला सर्वच पक्षाचे राजकीय पुढारी देखील जबाबदार असल्याचे अनेक कामगारांकडून व औद्योगिक वसाहती शेजारी असणाऱ्या ग्रामस्थांमधून चर्चिले जात आहे. औद्योगिक वसाहतीत येणारा रस्ता ज्या क्षमतेचा रस्ता बनवणे गरजेचे आहे त्या पद्धतीने न बनवल्याने या रस्त्यावर आता खड्डेच खड्डे पडले आहेत.
.
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सन २०१६ – १७ मध्ये महाड औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर सुमारे १ कोटी च्या वर खर्च करण्यात आला , तर सन २०१७ – १८ मध्ये देखील जवळपास ८० लक्ष इतका खर्च . त्याची डाकबुजी व काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात नूतनीकरण यावर खर्च झाला आहे यामध्ये पोट भरून ठेकेदारांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून. अंतर्गत रस्ते दुरुस्ती करण्याच्या नावाखाली कामे जैसे थे ठेवून ठेकेदार मलामाल झाल्याचे औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे पावसाळ्यात केवळ मातीने भरले जाणारे खड्डे अवजड वाहनाच्या वजनाने कांही तासातच जैसे थे झाल्याची स्थितीत या रस्त्यावर पाहण्यास मिळते.
महाड औद्योगिक वसाहती मधील. एम.एम.ए. हॉस्पिटल समोरून खड्ड्यांच्या प्रवासाला सुरवात होते. सुदर्शन केमिकल कंपनी समोर तर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सुदर्शन केमिकल पासून थेट प्रीव्ही कंपनी पर्यंत असणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यात रस्ता ही रस्त्यात खड्डा अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे आपटे ऑरगॅनिक च्या समोरील आणि मागील बाजूस असलेला रस्ता पूर्णपणे जमीन दोस्त झाला आहे. अनेक ठिकाणी अंतर्गत मार्गावर मोऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे खचल्या आहेत. कोपरान कंपनी पासून पुढे गेल्यावर एक्वा फार्म कंपनी पर्यंत देखील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमधून वाहने चालवणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे
महाड आसनपोई ते बिरवाडी हा मार्ग देखील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असून या मार्गाची देखील सद्या बिकट अवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. नांगलवाडीपासून चार किमी अंतराच्या कामाला सन 2023 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली होती. सुमारे अकरा कोटी रुपये याकरिता मंजूर झाले होते. खडीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण अशा स्वरूपाचे काम मंजूर झाले होते मात्र औद्योगिक क्षेत्रातील अवजड वाहनांची क्षमता पाहिल्यानंतर त्या क्षमतेचे रस्ते असणे आवश्यक आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली. या मागणीचा विचार करून औद्योगिक विकास महामंडळाने काँक्रिटीकरण कामाला मंजुरी दिली. मात्र ही मंजुरी पावसाळ्याच्या तोंडावर मिळाल्याने रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही. मार्च २०२३ मध्ये या कामाला मंजुरी मिळाली. या काँक्रिटीकरण कामासाठी सुमारे ९३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या डांबरी रस्त्यावर अनेक खड्डे पडले . असून हे पडलेले खड्डे भरायचे कोणी ज्या ठेकेदाराला काम मिळाले आहे त्याने की औद्योगिक विकास महामंडळाने खड्डे भरण्यासाठी नवीन टेंडर काढून खड्डे भरायचे असा प्रश्न या रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांसहित कामगारांना व कंपनीत जाणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना पडला आहे.