• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एमसीए आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेला रायगड जिल्ह्यात सुरुवात

ByEditor

May 1, 2025

रायगडच्या पंकज इटकर व साताऱ्याच्या सुयश पडळकर यांची शतकी खेळी

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा (इन्व्हिटेशन) दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटस रसायनी पाताळगंगा व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उलवे येथील मैदानावर शुभारंभ करण्यात आला.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स मैदान

रिलायन्स क्रिकेट मैदान नागोठणे येथे कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघांमधील सामन्याचा शुभारंभ रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, सदस्य ॲड. पंकज पंडित, देवेंद्र पाटील, मिलिंद मांढरे, संदीप जोशी, सुयोग चौधरी, वरुण म्हात्रे, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असो.सदस्य रहीम खान, युनायटेड स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक माऊली जागीरदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटसच्या मैदानावर सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध वायएमसीए क्रिकेट क्लब संघांमधील सामन्याचा शुभारंभ आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे, सदस्य कौस्तुभ जोशी, आरडीसीएचे मार्गदर्शक व प्रशिक्षक नयन कट्टा, शंकर दळवी यांच्या उपस्थितीत करण्यात आला तर तिसरा सामना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उलवे पनवेल येथे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध साऊथ झोन संघांमधील सामन्याचा शुभारंभ लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, उपाध्यक्ष राजेश पाटील, किरीट पाटील, प्रदिप खलाटे, नरेंद्र मयेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण उलवे-पनवेल

सामन्याच्या पहिल्या दिवशी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा धडाकेबाज फलंदाज पंकज इटकर याने नाबाद झुंझार शतक झळकावले तर साताऱ्याच्या सुयश पडळकर याने शानदार फलंदाजी करत शतक (१०१) ठोकले. रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीनंतर एमसीएच्या आंतरजिल्हा इन्व्हिटेशन क्रिकेट स्पर्धा होत असल्याने तिन्ही मैदानावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रायगड जिल्ह्यातील मैदान हिरवेगार व खेळपट्ट्या दर्जेदार असल्याने उपस्थितांनी कौतुक केले आहे. तसेच सामन्याचे आयोजन नियोजनबद्ध करण्यात आले आहे. भविष्यात विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्ह्यात करणार असल्याचे मत जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!