गौतम जाधव
इंदापूर : रायगड जिल्हा प्रेस क्लब संलग्न माणगांव तालुका प्रेस क्लबने माणगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना दि. १३ जुलै रोजी त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पुरस्कार देऊन त्याना सन्मानित केले.
यावेळी वावेदिवाळी येथील प्रगतशील शेतकरी रमाकांत भिकाजी कदम आणि स्वराज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज तांबे यांनी सुचविलेले कळमजे येथील प्रगतशील शेतकरी सतीश काशीराम वाढवल हे दोन्ही माणगांव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आधुनिक पद्धतीने आपली शेती करत असल्यामुळे रमाकांत कदम यांना रायगड जिल्हा प्रेस क्लबचे सहसचिव पदमाकर उभारे आणि माणगांव ता. प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात आले. कळमजे येथील शेतकरी सतीश वाढवल यांना माणगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वराज संघटनेचे प्रतिनिधी स्वप्नील शिर्के यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

सालाबादप्रमाणे रायगड प्रेस क्लब प्रगतशील शेतकऱ्यांना पुरस्कार देत आले असून हा संकल्प रायगड प्रेस क्लब अनेक वर्ष राबवत आली आहे. या शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला ते शेतकरी सर्व हंगामी पिके घेत असतात. त्यामुळेच त्यांना यावेळी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काच्या कार्यक्रमासाठी माणगांव तालुका प्रेस क्लबचे कार्यध्यक्ष गौतम जाधव, माजी अध्यक्ष उत्तम तांबे, सचिव हरेष मोरे, खजिनदार सचिन वनारसे, विनोद सापले तसेच वावेदिवाळी ग्रामस्थ तसेच माजी तंटामुक्त अध्यक्ष प्रमोद सावंत, गोपाळ कदम, संदीप कदम, महेश राऊत, प्रकाश कदम, सूचन कदम, विशाल कदम, राजेद्र कदम, वसंत कदम, आत्मराम कदम, रविंद्र कदम, समिर कदम, रविंद्र पवार हे उपस्थित होते.
कलमजे येथे माणगांव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वराज्य संघटनेचे प्रतिनिधी स्वप्निल शिर्के, माजी सरपंच माधुरी मुकुंद वाढवल, माजी उपसरपंच प्रविण पाखुर्डे, पोलीस पाटील सुभाष वाढवल, उपसरपंच मंगेश पवार, शरद वाढवल, जयदास वाढवल, मुकुंद वाढवल, सुरेश राऊत, मोरेश्वर गजमल, बाबू वाढवल, राम पडवळ, अनंत वाढवल, सुधीर वाढवल, हरिचंद्र राऊत हे उपस्थित होते.