• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी

ByEditor

Aug 9, 2024

तळा तालुक्यात घडली होती घटना

मजिद हजिते
माणगाव :
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा माणगांव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. सदरची घटना ही मौजे तळा येथील तळगड किल्ल्याचे परिसरातील पडत्या घरामध्ये दि. ७ जानेवारी २०२२ रोजी घडली होती.

या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी अबुजर इलियास वलिले याने पिडीत मुलगी (वय १५ वर्षे ९ महिने) ही तीचे मावशीचे मुलीसोबत परीट आळी येथील मावशीच्या घरून स्वतःचे घरी परत जात असताना वाटेमध्ये तिला थांबविले व माझेसोबत फिरावयास चल, मला तुझ्याशी बोलायाचे आहे, असे सांगून पिडीत मुलीस तळगड किल्ल्याच्या पायथ्याशी नेले व सोबत असलेल्या तिच्या मैत्रीणीला पायवाटेमध्ये थांबवुन पीडित मुलीला जवळील पडक्या घरामध्ये घेवुन गेला व मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगुन तिच्यावर अत्याचार केला. या घटनेप्रकरणी तळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तळा एस. एस. खराडे यांनी केला व सदरचे दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालय माणगांव येथे दाखल केले.

या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश माणगांव-रायगड येथे झाली. या खटल्यामध्ये अति. शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाचेवतीने काम पाहिले. या कामी पिडीत मुलगी, तिची मैत्रिण व वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष महत्वाचा पुरावा ठरली. या केसच्या सुनावणी दरम्यान अति. शासकीय अभियोक्ता योगेश तेंडुलकर यांनी प्रभावी युक्तीवाद करून मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. या केसच्या सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिनेश आघाव, म. पो. ह. छाया कोपनर, सिमा चांदोरकर, शशिकांत कासार, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. तसेच विशेष न्यायाधिश यु. टी. पोळ यांनी सदर गुन्ह्याच्या शाबितीनंतर आरोपी अबुजर इलियास वलिले यास दि. ८ ऑगस्ट रोजी दोषी धरुन २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व रोख रक्कम ५०,०००/- रुपये दंड ठोठावला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!