विनायक पाटील
पेण : शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रविवार, दि. ११/०८/२०२४ रोजी पेण तालुक्यातील मंत्रीवाडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या जाहीर सभेमध्ये एमएमआरडीच्या माध्यमातून होणाऱ्या भूसंपादनाबाबत शासनाच्या भूमिकेची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व त्यांचे सक्षम व निरपेक्ष नेतृत्व करण्यासाठी तसेच आपल्या विभागातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांना न्याय व रोजगार मिळवून देण्याकरिता व अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याकरिता या व्यतिरिक्त
गणपती कारखानदारांना योग्य न्याय मिळवून देण्याकरिता व त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता तसेच पाणी रस्ता यांसारखे मूलभूत प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता आणि शेती क्षेत्रातील निगडित शासकीय प्रश्नांसंदर्भात शेतकरी बांधवांना योग्य समुपदेशन, राजकीय उदासीनतेमुळे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या खारेपाट विभागामध्ये विकासकामांना गती आणण्याकरिता तसेच सामाजिक शैक्षणिक उद्यात्मिक असे सर्वच क्षेत्र गतिमान होण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अतुल म्हात्रे यांनी सांगितले आहे.
जाहीर सभेला पेण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र राज्य खजिनदार व मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे यांनी केले आहे.