• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत चिरनेर गावात आदिवासी दिन साजरा

ByEditor

Aug 9, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
जागतिक आदिवासी दिनानिमित्त उरण तालुक्यातील आदिवासी समाजाचा मेळावा चिरनेर या ऐतिहासिक गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याचे औचित्य साधून आदिवासी बांधवांनी हुतात्मा नाग्या महादू कातकरी तसेच १९३० सालच्या जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन केले.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार तथा रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल, युवा नेते राजेंद्र भगत, श्रीधर उर्फ बापु मोकल यांच्या उपस्थितीत गाव परिसरात प्रभात फेरीचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे औचित्य साधून कातकरी-ठाकूर आदिवासी समाजाचे अध्यक्ष अनिल पवार यांनी उपस्थित मान्यवरांना आदिवासी समाजाच्या टोप्या घालून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी कातकरी-ठाकूर आदिवासी समाजाचे उपाध्यक्ष हिरामण दौरे, खजिनदार दीपक कातकरी, सचिव शांताराम पवार, नामदेव ठाकूर उपस्थित होते. याप्रसंगी मोठ्या संख्येने आदिवासी, विद्यार्थी व बांधव उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!