• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पुरस्कार प्राप्त प्रा. एल.बी. पाटील, सुधीर शेठ, रमेश धनावडे यांचा कोमसाप रायगडकडून सत्कार

ByEditor

Aug 10, 2024

प्रतिनिधी
माणगाव :
कोमसाप रायगड जिल्हा कार्यकारिणीची माणगाव गोरेगाव दोशी महाविद्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील यांना शहीद भगतसिंग गौरव जिल्हास्तरीय महोत्सवात साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल साहित्य रत्न पुरस्कार शिव व्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले होते. कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटवल्याबद्दल नुकतेच त्यांना माणिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश धनावडे यांना मराठी साहित्य मंडळाचा नुकताच सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर नवभारत, नवराष्ट्र टाईम्स यांच्याकडून अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला आदर्श कला, साहित्यिक पुरस्कार देऊन रमेश धनवडे यांना दुसऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कोमसाप जिल्हा कार्यकारिणीत प्रा. एल बी पाटील, सुधीर शेठ व रमेश धनावडे या तिघांना मानसन्मान व पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. कोमसाप गोरेगाव शाखाध्यक्ष केदार खुळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आपापल्या क्षेत्रात या तिघांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!