• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘रायगड जनोदय’ इम्पॅक्ट । लांब पल्ल्याच्या एसटी बस पेण, वडखळ ब्रिज खालून जाणार

ByEditor

Aug 11, 2024
संग्रहित

विश्वास निकम
कोलाड :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या काही एसटी बसेस पेण शहर व वडखळ नाका येथून न जाता त्या ओव्हर ब्रिजवरून जातात. त्याचा परिणाम वडखळ बाजारपेठेवर होत असून सर्वसामान्य प्रवाशी वर्गाला रामवाडी येथे उतरून दुसऱ्या गाडीने प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशी वर्गाला आर्थिक भुर्दंड व त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे एसटी बसेस या ओव्हर ब्रिजच्या खालून नेण्यात याव्या अशी मागणी विश्वास मधुकर बागुल, वरसगांव (कोलाड) येथील शिवसेना शाखाप्रमुख यांनी विभागीय नियंत्रण अधिकारी पेण यांना दिलेल्या लेखी निवेदनात १५ जुन रोजी केली होती.

या बाबतची बातमी ‘रायगड जनोदय’मध्ये १९ जुन रोजी प्रकाशित झाली. यानंतर याची दखल पेण विभागीय नियंत्रण अधिकारी यांनी घेऊन सर्व एसटी बस या ओव्हर ब्रिजच्या खालून वळवण्यात आल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा त्रास कमी झाला. या मार्गाने प्रवास करणाऱ्या पेण तालुक्यातील प्रवाशी वर्गाकडून ‘रायगड जनोदय’चे तसेच पत्रकार विश्वास निकम तसेच शिवसेना शाखाप्रमुख विश्वास बागुल यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!